S M L

मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलला, खातेवाटपाचा घोळ कायम

26 मार्च, दिल्ली पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचा दुसर्‍या फेरीतला विस्तार पुढे ढकलला आहे. यासंबधी 10 जनपथ या सोनिया गांधींच्या घरी बैठक झाली ए.के.अँटोनी,प्रणब मुखर्जी हे या बैठकीला उपस्थित होते. मनमोहन सिंग यांच्यासह एकोणीस मंत्र्यांचा शपथविधी गेल्या आठवड्यात झाला. त्यानंतर आज आणखी काही मंत्री शपथ घेणार होते. पण खातेवाटपातचा घोळ अजूनही सुटू शकलेला नाही. काँग्रेससमोर महत्वाचा असणारा मित्रपक्षांचा प्रश्न मात्र सुटला आहे. द्रमुकला जास्त मंत्रीपदं मिळाल्यामुळे राष्ट्रवादी आमि तृणमुल काँग्रेसमध्ये नाराजी होती. पण तृणमुल काँग्रेस 6 राज्यमंत्रीपदांवर आधी मिळालेल्या एका कॅबिनेट मंत्रीपदावर खूष आहे. तर राष्ट्रवादीला आणखी एक राज्यमंत्रीपद हवं आहे, त्यासाठी संगमा यांचं नाव पुढे करण्यात येतंय. मित्रपक्षांचा घोळ संपला तरी आता काँग्रेससमोर अंतर्गत समस्या आहे. काँग्रेसमधील कोणत्या खासदारांना मंत्रीपद द्यायचं यावरून चर्चा सुरु आहे. ज्या राज्यांनी काँग्रेसला जास्त जागा दिल्या त्या राजस्थान, उत्तर प्रदेश आणि आंध्रप्रदेश राज्याच्या खासदारांना मंत्रीमंडळात समावेश करायचा कि लवकरच विधानसभा निवडणूका होणार्‍या राज्यांमधील खासदारांना मंत्रीपद द्यायचं यावर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. यात मंत्रीपदासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, हरयाणाचे वीरभद्र सिंग, काश्मीरचे फारुख अब्दुल्ला यांची नाव आहेत. शिवाय अल्पसंख्यांक आणि महिलांना मंत्रीपद देताना समतोल कसा साधला जाईल यावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल.मतदानाचा निकाल लागून 10 दिवस झाले तरी अजून सरकार स्थापन झालेलं नाही. सूत्रांकडून अशी माहिती मिळतेय की आता हा शपथविधीचा सोहळा गुरुवारी होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2009 10:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2009 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close