S M L

गोरखपूरजवळ रेल्वे अपघात; 12 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Oct 1, 2014 03:26 PM IST

गोरखपूरजवळ रेल्वे अपघात; 12 जणांचा मृत्यू

01 ऑक्टोबर  : उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरजवळ लखनौ- बरौनी एक्स्प्रेस आणि कृषक एक्स्प्रेसची धडक होऊन मंगळवारी मध्येरात्री झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 45 जण जखमी आहेत.

मिळालेल्या महितीनूसार, कृषक एक्स्प्रेस ही वाराणसीहून गोरखपूरकडे जात होती. तर, बैरोनी एक्स्प्रेस गोरखपूरहून वाराणसीकडे जात होती. गोरखपूर स्टेशनजवळ मंगळवारी मध्यारात्री या दोन्ही एक्स्प्रेस गाड्यांची समोरासमोर धडक झाली. अपघातात बैरौनी एक्स्प्रेसच्या तीन डबे रुळावरून उतरले तर, कृषक एक्स्प्रेसचा एक डबा रुळावरून घसरला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बंद असून, मदत आणि बचावकार्य सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर, जखमींना 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2014 09:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close