S M L

‘स्वच्छ भारत’ अभियानाचं मोदींच्या हस्ते शुभारंभ

Samruddha Bhambure | Updated On: Oct 2, 2014 11:54 AM IST

‘स्वच्छ भारत’ अभियानाचं मोदींच्या हस्ते शुभारंभ

02 ऑक्टोबर : महात्मा गांधींच्या 145 व्या जयंतीनिमीत्त केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला म्हणजेच 'स्वच्छ भारत अभियान'चा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभारंभ केला आहे. थोड्याच वेळापूर्वी दिल्लीतल्या वाल्मिकी वस्तीत जाऊन पंतप्रधानांनी स्वतः झाडू हातात घेऊन सफाई केली. त्या वस्तीत एका स्वच्छतागृहाचं लोकार्पणही मोदींनी केलं आहे. त्याआधी पंतप्रधानांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली. तिथून विजयघाट इथे जाऊन त्यांनी लालबहादूर शास्त्रींनाही श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधानांसह अनेक केंद्रीय मंत्री आज देशातील विविध शहरांमध्ये हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश देतील. शासकीय कर्मचारी देखील या अभियानात सहभागी होणार आहेत. जवळपास 30 लाख कर्मचारी स्वच्छतेची शपथ घेतील. या योजनेनुसार देशातल्या 500 शहरांमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी विशेष उपाय योजना करण्यात येणार आहेत.

महात्मा गांधी यांना दीडशेव्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली होती. यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळाला कामाला जुंपले आहे. ही योजना लोकचळवळ बनावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं असून त्यांनी देश परदेशातल्या अनेक कार्यक्रमांमध्ये या योजनेबाबत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

प्रत्येक व्यक्तीने वर्षातील शंभर तास स्वच्छतेला द्यावेत, असंही आवाहन मोदी यांनी केले आहे. यावेळी मोदींनी देशातल्या 9 सेलिब्रिटींना 'स्वच्छ भारत अभियाना'त सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. त्यात अभिनेता सलमान खान, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, सचिन तेंडुलकर, कमल हसन, उद्योजक अनिल अंबानी, योगगुरु रामदेवबाबा तसंच काँग्रेस नेते शशी थरुर आणि मृदुल सिन्हा यांना अभियानात सहभागी होण्याचं मोदींनी निमंत्रण दिलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2014 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close