S M L

'स्वच्छ भारत' अभियानात महाराष्ट्राचा ठसा

Samruddha Bhambure | Updated On: Oct 2, 2014 11:59 AM IST

'स्वच्छ भारत' अभियानात महाराष्ट्राचा ठसा

02 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या आशियापंतप्रधान मोदींनी 2019 पर्यंत महात्मा गांधींचं 'स्वच्छ भारताचं' स्वप्न साकार करण्यासाठी 'स्वच्छ भारत मिशन' या लोकचळवळीचा आज शुभारंभ केला आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी देशपातळीवर लोगो आणि घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत 5168 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूरचे अनंत खासबागदार हे लोगो डिझाईन स्पर्धेचे, तर गुजरातच्या राजकोटच्या भाग्यश्री शेठ या टॅगलाईनचं स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या आहेत. खासबागदार यांना 50 हजार रुपयांचे, तर भाग्यश्री शेठ यांना 25 हजार रुपये रोख देऊन गौरविण्यात आलं आहे.

मोदींनी सर्व सरकारी कर्मचार्‍यांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी शपथ दिली. यावेळी मोदींनी सफाई कर्मचार्‍यांशी चर्चा केली. केंद्रीय कॅबिनेटमधल्या जवळपास सगळ्या मंत्र्यांनी गेल्या आठवड्याभरापासून झाडू हातात घेतला आहे.' मायगव्हर्न ' या वेबसाईटद्वारे लोगो आणि घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली होती.

विजेत्या लोगोमध्ये महात्मा गांधींच्या चष्म्यावर दोन्ही बाजूला 'स्वच्छ भारत' असे लिहून दोन्ही काचांना जोडणार्‍या पट्टीवर भारत ध्वजातील तीन रंग वापरून अवघा भारत या 'स्वच्छ भारत' अभियानात सहभागी असल्याचे दर्शविण्यात आलं आहे. हा फक्त लोगो नाही, यात गांधींजी आपल्यावर नजर ठेवून आहेत. आपण त्यांचं स्वप्न पूर्ण करतोय की नाही यावर त्यांचं लक्ष असणार आहे असं या लोगोतल्या चष्म्यांचं वैशिष्ठ्य असल्याचं मोदींनी सांगितल. तर 'एक कदम, स्वच्छता की ओर' ही टॅगलाईन प्रत्येक भारतीय या अभियानात सहभागी असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2014 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close