S M L

मी कचरा करणार नाही, आणि मी कचरा करू देणार नाही- मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Oct 2, 2014 03:56 PM IST

मी कचरा करणार नाही, आणि मी कचरा करू देणार नाही- मोदी

02 ऑक्टोबर :  महात्मा गांधींच्या 145 व्या जयंतीनिमीत्त केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला म्हणजेच 'स्वच्छ भारत अभियान'चा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभारंभ केला आहे. या अभियानाला राजकारणाशी जोडू नये, हे राष्ट्रभक्तीचे काम असं म्हणत मोदींनी 'मी कचरा करणार नाही, आणि मी कचरा करू देणार नाही', अशी शपथ सर्वांना दिली आहे. 2019 पर्यंत भारताला आपल्याला 'स्वच्छ देश' म्हणून जगासमोर आणायचे असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितलं.

या कार्यक्रमाला विद्यार्थीआणि सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. चित्रपट अभिनेता आमीर खान देखील स्वच्छ भारत अभियानमध्ये सहभागी झाला होता. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. पंतप्रधानांनी क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अभिनेता सलमान खान, प्रियांका चोप्रा, काँग्रेस नेते शशी थरुर, उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासह नऊ जणांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. 'स्वच्छता राखणे ही काही फक्त स्वच्छता कर्मचार्‍यांची जबाबदारी नाही, तर प्रत्येक भारतीयाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे', असंही ते म्हणाले आहेत.

'आज महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रींचे आपण स्मरण करतो. शास्त्रीजींनी देशाला 'जय जवान-जय किसान'चा नारा दिला. त्यानंतर शेतकर्‍यांनी देशाची धान्याची कोठारे भरुन टाकली. महात्मा गांधींनी 'क्विट इंडिया-क्लीन इंडिया'ची घोषणा केली होती. इंग्रज तर निघून गेले पण त्यांचं क्लीन इंडियाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. ते आपल्याला पूर्ण करायचं आहे.' असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

देश स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंतच्या अनेक सरकारांनी देशात स्वच्छतेचं काम केले आहे. त्यांचे काम नाकारता येणार नाही, असे सांगत पंतप्रधान मोदींनी आधीच्या सरकारच्या कामाचा गौरव केला. स्वच्छ भारत अभियानाची औपाचरिक सुरवात करण्याआधी पंतप्रधानांनी आज (गुरुवारी) सकाळी दिल्लीतल्या वाल्मिकी वस्तीत जाऊन पंतप्रधानांनी स्वतः झाडू हातात घेऊन सफाई केली. त्या वस्तीत एका स्वच्छतागृहाचं लोकार्पणही मोदींनी केलं. त्याआधी पंतप्रधानांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली. तिथून विजयघाट इथे जाऊन त्यांनी लालबहादूर शास्त्रींनाही श्रद्धांजली वाहिली.

मोदींनी दिलं क्लीन इंडिया चॅलेंज

ज्याप्रकारे परदेशात 'आईस बकेट चॅलेंज' यशस्वी झालं तसंच प्रत्येक भारतीयाने या आपल्या ओळखीतल्या 9 जणांना 'क्लीन इंडिया चॅलेंज' द्यावं. त्यांनी त्यांच्या ओळखीतल्या 9 जणांना चॅलेंज द्यावं. अशारित्या ही स्वच्छता अभियान सुरू राहिलं. या कार्येक्रमात मोदींनी 9 सेलिब्रिटींना 'क्लीन इंडिया चॅलेंज' दिलं आहे. यात रामदेवबाबा, प्रियांका चोप्रा, सलमान खान, सचिन तेंडुलकर, कमल हसन तसचं काँग्रेस नेते शशी थरुर, उद्योजक अनिल अंबानी यांना आवाहन दिलं आहे. तसचं तारक मेहता का उल्टा चष्मा टीमलाही मोदींनी हे चॅलेंज दिलं आहे. कुठं कचरा असेल तर त्याचे फोटो mygov.in या वेबसाईटवर अपलोड करा. नंतर त्याच जागेची तुम्ही साफसफाई करा, आणि मग त्या जागेचे आणि तुमचे फोटो अपलोड करा. आपण स्वच्छता करणार्यांना हिरो बनवूया असं ही ते म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2014 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close