S M L

पंतप्रधानांची 'मन की बात'

Samruddha Bhambure | Updated On: Oct 3, 2014 03:08 PM IST

PM Narendra Modis Teachers Day Speech

03 सप्टेंबर :  खादीचा एक कपडा वापरल्याने देशातील गरीबांना मदत होईल त्यांच्या घरात दिवाळी साजरी होईल, त्यामुळे खादीची जास्तीत जास्त पण किमान एखादं तरी खादीचं वस्त्र वापरुयात असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑल इंडिया रेडिओवरून केले.

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी आज (शुक्रवारी) सकाळी ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून देशवासीयांना संबोधित केलं. मोदींनी सर्व देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी प्रत्येकाने विजयादशमी दिवशी आपल्यातील दहा अवगुणांना संपवण्याची शपथ घ्यावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. देशातील शेतकरी, स्त्रिया आणि युवकांमध्ये खरी शक्ती आहे आणि सर्व समस्यांवर मात करण्याची ताकद या त्रिशुळामध्ये आहे असल्याचेही ते म्हणाले. रेडिओ म्हणजे देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचण्याचे उत्तम माध्यम असल्याचे सांगत मोदींनी दर रविवारी 11 वा. देशवासियांशी संवाद साधणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केले.

स्वच्छ भारत मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांपर्यंत पोहोचण्याचा आणखी एक प्रयत्न केला. आज त्यांनी देशाला रेडिओवरून संबोधित केलं. रेडिओवरून मोदींचं हे पहिलंच भाषण आहे, त्याद्वारे ते 90 टक्के नागरिकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. मन की बात असं या उपक्रमाचं नाव आहे. या भाषणाद्वारे मोदींचा मुख्यतः ग्रामीण नागरिकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. 24 भारतीय आणि 16 परदेशी भाषांमधून हे भाषण प्रसारित होणार आहे. विशेष म्हणजे या भाषणाचं स्वरुप कसं असावं याविषयी सर्वसामान्यांकडून मतं मागवण्यात आली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2014 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close