S M L

पाटणा चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा 33 वर

Sachin Salve | Updated On: Oct 4, 2014 03:13 PM IST

पाटणा चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा 33 वर

04 ऑक्टोबर : पाटण्यामध्ये विजयादशमीच्या दिवशी चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा आता 33 वर पोहचला आहे. तर 29 जण जखमी झाले आहे. शुक्रवारी पाटण्यातल्या गांधी मैदानावर रावणदहनाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 28 महिला आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आलीय.. चेंगराचेंगरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रावणाच्या पुतळ्याचं दहन झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली होती. वीजेची तार पडल्याची अफवा पसरल्यामुळे चेंगरीचेंगरी झाल्याचा अंदाज आहे. अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत. त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2014 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close