S M L

मोदींसाठी स्टँडबाय असलेल्या विमानात आढळला ग्रेनेड !

Sachin Salve | Updated On: Oct 4, 2014 05:32 PM IST

मोदींसाठी स्टँडबाय असलेल्या विमानात आढळला ग्रेनेड !

04 ऑक्टोबर : नुकताच अमेरिका दौरा आटोपून भारतात परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्टँडबाय असलेल्या एअर इंडियाच्या विमानात रिकामा ग्रेनेड आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणा हादरली आहे. हे विमान मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यासाठी स्टँडबाय म्हणून सज्ज होते.

पण या विमानाचा वापर झाला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौर्‍यावर जाण्यासाठी एअर इंडियाकडून विशेष विमान सज्ज करण्यात आलं होतं. पंतप्रधानांच्या दौर्‍यासाठी ऐनवेळी काही अडचण आल्यास आणखी एक विमान सज्ज करण्यात आलं होतं. एअर इंडिया केबी-747 असं हे विमान होतं. मात्र हे विमान मोदींच्या दौर्‍यादरम्यान वापरण्याची वेळ आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मोदी भारतात परतल्यानंतर हे विमान पुन्हा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आलं त्यानंतर हा प्रकार समोर आला. सध्या हे विमान दिल्ली-मुंबई-हैदराबाद-जेद्दा ला पाठवण्यात आलंय. शनिवारी सकाळी जेद्दामध्ये हे विमान पोहचल्यानंतर सुरक्षारक्षकांनी विमानाची तपासणी केली असता विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये रिकामा ग्रेनेड सापडला. पंतप्रधानांच्या दौर्‍यासाठी सज्ज करण्यात आलेल्या विमानात ग्रेनेड आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2014 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close