S M L

महाराष्ट्रातल्या 6 मंत्र्यांनी घेतली शपथ

28 मे 15व्या लोकसभेच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसर्‍या टप्प्यात एकूण 59 मंत्र्यांनी शपथ घेतली. या दुसर्‍या टप्प्यातल्या शपथविधीमध्ये महाराष्ट्राच्या 6 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, विदर्भातले मुकुल वासनिक, गुरुदास कामत, पृथ्वीराज चव्हाण, प्रतीक पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा समावेश होता. या आधी म्हणजे 22 मेला 15 व्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या शपथविधीमध्ये केंद्रीय कृषी मंत्री म्हणून शरद पवार, तसंच केंद्रीय मंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे आणि मुरली देवरा यांनी शपथ घेतली. यंदा मंत्रिमंडळात पहिल्यांदाच गुरुदास कामत यांचा समावेश करण्यात आला आहे.' मला कुठल्याही खात्याचं काम दिलंतरी ते मी आनंदाने स्वीकारेन. माझे पुनर्वसन केलं नाही तर मी पक्षासाठी खूप मेहनत घेतली आहे. काँग्रेसमध्ये मेहनत आणि निष्ठेला महत्त्व आहे. त्यांचंच श्रेय मला मिळालं अशी प्रतिक्रिया विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली. मुकुल वासनिक यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर त्यांच्या समर्थकांनी नागपूर जल्लोष केला. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींचा होता अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुकुल वासनिक यांनी दिली आहे. तसंच राहुल गांधी सध्या संघटना मजबूत कण्याचं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात तीन आणि नंतरच्या टप्प्यात सहा अशा महाराष्ट्रातल्या एकूण नऊ मंत्र्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. तर राहुल गांधी यांनी दिलेल्या संधीचं सोनं करू, असा विश्‍वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या महाराष्ट्राच्या 9 खासदारांविषयी - विलासराव देशमुख - सध्या कॅबिनेटमंत्री. 1974 पासून राजकारणात सक्रिय. 1974 ते 1976 बाभळगावचे सरपंच. जिल्हा परिषद सदस्य, लातूर पंचायत समितीचे डेप्युटी चेअरमन. महसूल, सहकार, कृषी, गृह, उद्योग आणि शिक्षण अशा विविध खात्यांचे मंत्री अशी विविध पदं त्यांनी सांभाळली आहेत. 1999 ते 2003 आणि 2004 ते 2008 अशा दोन टप्प्यांत ते राज्याचे मुख्यमंत्री होते. 1980 ते 1995 या काळात महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य. 26/11 च्या मुंबई हल्ल्यांमुळे त्यांना त्यांचं पद गमावावं लागलं होतं. प्रफुल्ल पटेल - सध्या स्वतंत्र खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री. या आधी त्यांनी राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सांभाळला आहे. ते माजी नागरी वाहतुक मंत्री होते. या आधी ते 1991, 96 आणि 98 मध्ये लोकसभेवर तीनदा निवडून गेले होते. ते एक उद्योगपती आणि एक राजकारणी म्हणून सर्वज्ञ आहेत. 2003 मध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष.पृथ्वीराज चव्हाण - सध्या स्वतंत्र खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री. या आधी ते पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री होते. खासदार म्हणून आतापर्यंत तीन वेळा लोकसभेत निवडून आले आहेत. 2002मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. 26/11च्या मुंबई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचंही नाव चर्चेत होतं. मुकुल वासनिक - सध्या केंद्रीय राज्यमंत्री. 1984 साली वयाच्या पंचविसाव्या वर्षी लोकसभेवर. 1984, 91 आणि 1998 मध्ये लोकसभेवर निवडून आले होते. माजी केंद्रीय क्रीडा मंत्री होते. यंदाची लोकसभा निवडणूक त्यांनी रामटेक मतदारसंघातून लढवली होती. यंदा त्यांना लोकसभेत दुस-यांदा संधी मिळाली आहे. गुरुदास कामत - सध्या केंद्रीय राज्यमंत्री. 1972 मध्ये एनएसयुआयसारख्या विद्यार्थी चळवळीतून सक्रीय राजकारणात प्रवेश केला. 1984 ते 87- युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1984मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले होते. 1991, 98 आणि 2004च्या लोकसभा निवडणुका ते जिंकले होते. प्रतीक पाटील - सध्या केंद्रीय राज्यमंत्री. व्यवसायाने ऑटोमोबाईल इंजिनिअर. यंदा महाराष्ट्रातल्या सांगली मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले होते. त्या आधी 2006 च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. ते वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. शरद पवार - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष. सध्या कॅबिनेट मंत्री. कृषी खातं त्यांच्याकडे काँग्रेसने सोपवलं आहे. पूर्वीही त्यांच्याकडे कृषी खातं होतं. युवक काँग्रेसचे 24 व्या वर्षी अध्यक्ष. 38 व्या वर्षी ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर दोनवेळा राज्याची मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी संभाळली. 1991 साली नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून जबाबदारी संभाळली तर मार्च 1993 साली मुंबई बॉम्बस्फोटानंतर पुन्हा मुख्यमंत्री पदी काम केलं. 10 जून 1999 साली राष्ट्रवादी कॉग्रेसची स्थापना केली. 1995 साली बारामती लोकसभेत निवडून त्यानंतर कॉग्रेस पक्षाचे लोकसभेतले नेते म्हणून निवडून आले . 1998 साली लोकसभेतले विरोधीपक्षनेते म्हणून निवड झाली. 32 वर्षाच्या राजकीय जीवनात 7 वर्षे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. ते आर्थिक उदारिकरणाचे समर्थक आहेत. 1967 साली पहिल्यांदा विधानसभेत बारामती मतदारसंघातून . 1967 ते 1991 पर्यंत विधानसभेवर बारामतीतून निवडून आले .1972 ते 74 पर्यंत गृहराज्य मंत्री ,अन्न व नागरी पुरवठा, क्रीडा युवक कल्याणसारखी खाती संभाळली आहेत. सुशीलकुमार शिंदे - सध्या कॅबिनेट मंत्री. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे पहिले दलित मुख्यमंत्री. आंध्रप्रदेशचे राज्य पाल होते. महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी अर्थसंकल्पही सादर केला आहे. उपनिरिक्षक पदावर त्यांनी पोलीस खात्यात काम केलं आहे. वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्या नंतर 1971 साली पोलिस खात्यातली नोकरी सोडून त्यांनी शरद पवारांच्या आग्रहाखातर राजकारणात प्रवेश केला. 1974 साली करमाळ्यातून निवडणूक लढवली आणि 25 हजाराच्या मताधिक्याने निवडून आले .त्यानंतर वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. काँग्रेसचा राजीनामा देऊन पुरोगामी लोकशाही दलामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली प्रवेश 3 वर्षानंतर पुन्हा कॉग्रेसमध्ये प्रवेश आणि वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री. 1999 च्या निवडणूकीत सोनिया गांधी यांचे कॅम्पेन मॅनेजर म्हणून काम पाहिले . मार्च 2006 बिनविरोध राज्यसभेवर निवडून आले. युपीएच्या मंत्रिमंडळात ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं आहे. सोलापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. मुरली देवरा - सध्या कॅबिनेट मंत्री. 1968 ते 78 मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून दोनदा निवड. 1977 आणि 1978 साली त्यांचे मुंबईचे महापौर म्हणून निवड झाली होती. 1982 ते 1985 विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली होती. 1984 साली मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवड. 1985 साली पहिल्यांदा खासदार म्हणून दक्षिण मुंबईतून निवडणूक जिंकले. 2006 साली केंद्रात पेट्रोलियम मंत्री म्हणून निवड. नियोजन आणि अंमलबजावणी मंत्रालयाच्या तसंच वित्त मंत्रालयाच्या सल्लागार. समित्यांवर अनेकदा सदस्य म्हणून निवड, गेल्या काही वर्षांपासून मुंबईत मोफत नेत्रचिकित्सा शिबिरं तसंच गरीब आणि गरजू मुलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण वर्गांचं आयोजन करण्यात पुढाकार.इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे उपाध्यक्ष म्हणून अनेक नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदत कार्यात अग्रेसर.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2009 01:38 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2009 01:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close