S M L

पाकिस्तानकडून गोळीबारात 5 भारतीय नागरिक ठार

Samruddha Bhambure | Updated On: Oct 6, 2014 02:38 PM IST

pakistan violates ceasefire again-8388906 ऑक्टोबर :  पाकिस्तानने आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानी सैन्यान सीमेजवळ काल रात्री दीडच्या सुमारास गोळीबार सुरू केला. या गोळीबारात 5 भारतीय नागरिक ठार झाले असून 34 जण जखमी झाले आहेत. गेल्या 3 दिवसांत पाकिस्तानचा भारतीय हद्दीतला हा दुसरा गोळीबार आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, जम्मूमधल्या अर्निया भागात आर.एस. पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी थेट भारतीय नागरिकांच्या घरावरच हल्ला चढवला. त्यासाठी त्यांनी उखळी तोफांचाही वापर केला. यात अनेक घरांचं नुकसान झालं असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 10 वर्षांच्या मुलाचा तर जखमींमध्ये एका बीएसएफच्या जवानाचा समावेश आहे.

आज सकाळपर्यंत हा गोळीबार सुरू होता, त्याला भारतीय जावानांनीही चोख प्रत्यूत्तर दिलं आहे. जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, सकाळी आठ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2014 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close