S M L

सीबीएसई बोर्डात नागपूरची वेदवती अलबाळ सर्वप्रथम

29 मे, नागपूर देशभरातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या चार विभागापैकी तीन विभागाचे दहावीचे निकाल जाहीर झालेत. त्यामध्ये नागपूरच्या वेदवती अलबाळ या मुलीनं प्रथम क्रमाक पटकावला आहे. वेदवती अलबाळ हिला 98.6 टक्के गुण मिळाले असून तीन विषयात तीला 100 पैकी 100 गुण मिळाले आहे.वेदवतीची प्रथम येण्याची इच्छा होती. पण ती तीन भागातून पहिली येईल याची तीला कल्पना नव्हती. याबद्दल वेदवती सांगते, '' माझी 95 ते 96 टक्क्यांची अपेक्षा होती. पण मला एकदम 98.6 टक्के मिळतील असं वाटलं नव्हतं, असं वेदवती म्हणाली. 98.6 टक्के इतके गुण मिळणं हा वेदवतीसाठी धक्का होती. कळलं तेव्हा सगळ्यांनाच आनंद झाला, असंही वेदवती म्हणाली. वेदवतीने तिच्या यशाचं श्रेय तिचे आई-वडील आणि शाळेतल्या शिक्षकांना दिलं आहे. तिला मेडिसीन विषयातून एमबीएस करायचं आहे. ' मला जेनेटीक्स हा विषय आवडतो. त्यामुळे त्या विषयात पुढे संसोधन करायचं आहे, 'असंही वेदवती ती म्हणाली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2009 11:18 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2009 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close