S M L

पाकिस्तानची पुन्हा आगळीक, गोळीबारात 5 ठार

Samruddha Bhambure | Updated On: Oct 7, 2014 03:31 PM IST

पाकिस्तानची पुन्हा आगळीक, गोळीबारात 5 ठार

07 ऑक्टोबर : भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सीमेवरचा तणाव वाढत चालला आहे. पाकिस्तानकडून होणारा गोळीबार सुरू अजूनही आहे. जम्मूमधल्या सीमारेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने काल रात्रभरात 4 ठिकाणी जोरदार गोळीबार केला. यात 5 जण ठार झाले आहेत. गेल्या 3 दिवसांपासून पाकिस्तानने जम्मू भागातल्या आर.एस. पुरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू ठेवलं आहे. त्यामध्ये त्यांनी सीमाभागात गावातल्या सामान्य नागरिकांची घरं, बीएसएफच्या चौक्या यांना लक्ष्य केलं आहे. रात्रीपासून पाकिस्ताननं बीएसएफच्या 40 चौक्यांवर गोळीबार केला आहे. यामध्ये पाकिस्तानी रेंजर्सचा सहभाग असल्याचा आरोप बीएसएफनं केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2014 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close