S M L

ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या विद्यार्थ्यांवरच्या हल्ल्यात वाढ

29 मे ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांवर होणार्‍या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकताच मेलबर्नमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाला. मेलबर्नमधल्या बलजिंदर नावाच्या विद्यार्थ्यावर सोमवारी रात्री दोघांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे बलजिंदरच्या पोटावर जखमा झाल्या आहेत. आपल्यावर हल्ला करण्यापूर्वी त्या दोघांनी आपल्याकडे पैशांची मागणी केल्याचं बलजिंदरनं सांगितलं आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तीवर झालेला या महिन्यातला हा तिसरा हल्ला आहे. या हल्ल्यापूर्वी, आंधप्रदेशातल्या चार मुलांवर मेलबोर्नमध्ये दारू पिऊन स्क्रू ड्राइव्हरने काही तरुणांनी हल्ला केला होता. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मेंदूला गंभीर जखम झाली आहे. श्रावण कुमार असं त्याचं नाव आहे. दरम्यान श्रावणकुमार याच्या मित्रांनी अजूनही धमक्या येत असल्याची तक्रार केलीये. हल्लेखोरांनी या सगळ्यांनाभारतात परतण्याची धमकी दिली.याप्रकरणी मेलबर्न पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. दरम्यान ऑस्ट्रेलियन सरकारनेही याप्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. याप्रकरणी दोघांना अटक झाल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे हाय कमिशनर जॉन मॅकॅथी यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2009 11:51 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2009 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close