S M L

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्याच्या घरावर फेकला पेट्रोल बॉम्ब

29 मे मंगळवारी सिडनीमध्येभारतीय विद्यार्थ्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. यात राजेशकुमार हा तीस वर्षांचा विद्यार्थी 30 टक्के भाजलाय. त्याचा रुममेट अमरिंदर सिंग यांने वेळीच सावधनता बाळगल्याने तो या हल्ल्यातून बचावला आहे. अज्ञात व्यक्तींना हा पेट्रोल बॉम्ब फेकल्याचं आजूबाजूच्या रहिवाशांनी सांगितलं. सिडनीमधला हा पेट्रोल बॉम्बने भारतीय विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला पाहता ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले आता वाढत चालल्याचं दिसतंय. गेल्या तीन आठवड्यात भारतीय विद्यार्थ्यांवर चार हल्ले झालेत.दरम्यान ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर याआधी झालेल्या हल्ल्यांप्रकरणी पोलिसांना अजून काही जणांना अटक केलीये. एका लोकल ट्रेनमध्ये सौरभ शर्मा या विद्यार्थ्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी या संशयितांना ताब्यात घेतलं आहे. तर अशाच एका प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय. दरम्यान ऑस्ट्रेलियात वांशिक भेदाची समस्या असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाच्या भारतातल्या उच्चायुक्तांनी दिलीये. ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय. नुकताच मेलबर्नमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झालाय. मेलबर्नमधल्या बलजिंदर नावाच्या विद्यार्थ्यावर सोमवारी रात्री दोघांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे बलजिंदरच्या पोटावर जखमा झाल्यात. आपल्यावर हल्ला करण्यापूर्वी त्या दोघांनी आपल्याकडे पैशांची मागणी केल्याचं बलजिंदरनं सांगितलं.दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तीवर झालेला या महिन्यातला हा तिसरा हल्ला आहे. या हल्ल्यापूर्वी आंधप्रदेशातल्या चार मुलांवर मेलबोर्नमध्ये दारु पिउन स्क्रू ड्राइव्हरने काही तरुणांनी हल्ला केला होता. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मेंदूला गंभीर जखम झाली आहे. श्रावण कुमार असं त्याचं नाव आहे. दरम्यान श्रावणकुमार याच्या मित्रांनी अजूनही धमक्या येत असल्याची तक्रार केलीये. हल्लेखोरांनी या सगळ्यांना भारतात परतण्याची धमकी दिलीये. याप्रकरणी मेलबर्न पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतलीये. दरम्यान ऑस्ट्रेलियन सरकारनंही याप्रकाराबद्दल खेद व्यक्त केलाय. याप्रकरणी दोघांना अटक झाल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे हाय कमिशनर जॉन मॅकॅथी यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2009 03:52 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2009 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close