S M L

आंध्रच्या किनारपट्टीवर 'हुडहुड' चक्रीवादळ धडकणार, हायअलर्ट जारी

Sachin Salve | Updated On: Oct 9, 2014 03:22 PM IST

आंध्रच्या किनारपट्टीवर 'हुडहुड' चक्रीवादळ धडकणार, हायअलर्ट जारी

strom09 ऑक्टोबर : आंध्रप्रदेश, ओडिसा आणि प. बंगालच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाचं संकट घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरात 'हुडहुड' चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे.

149 किलोमीटर वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. त्यामुळे ओडिसा आणि प. बंगाल प्रशासनाने हायअलर्ट जारी करण्यात आलाय. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे चक्रीवादळ आता अंदमान निकोबार बेट पार करत आहे, पुढच्या 36 तासात हे वादळ अतिशय तीव्र होण्याचे संकेत आहेत.

विशाखापट्टणमला पोहचेपर्यंत या वादळाच्या तीव्रतेमुळे ताशी 149 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय. एनडीआरएफ (NDRF)ने या दोन्ही राज्यात मदतकार्यासाठी पथक पाठवले आहेत. खबरदारी म्हणून समुद्रकिनार्‍यालगतच्या गावांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2014 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close