S M L

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ

Samruddha Bhambure | Updated On: Oct 11, 2014 01:01 PM IST

modi 5 sep speech

11 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महत्वकांक्षी आदर्श ग्राम योजनेचं दिल्लीमध्ये या कार्यक्रमाचं शुभारंभ करण्यात आला आहे. आदर्श ग्राम योजनेच्या अंतर्गत प्रत्येक खासदाराला 2019 पर्यंत तीन गावांमध्ये प्राथमिक सोयी आणि प्रशासकीय यंत्रणा यांचा विकास करावा लागणार आहे. वर्षभरात 800 गावांचा कायापालट करण्याचं पंतप्रधानांचं ध्येय आहे. खासदारांचा सहभाग असलेल्या या योजनेत 1500 गावांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. जशी खासदारांच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. त्याचप्रमाणे राज्ये आमदारांच्या माध्यमातूनही ही योजना राबवू शकातात. त्यामुळे आणखी काही गावे यात जोडली जाऊ शकते. सध्या योजना आणि त्याचा फायदा याचा विचारच केला जात नाही. या योजनेमुळे खासदारांचा थेट गावांशी संपर्क येईल. यात खासदारांना स्वातंत्र्य असणार आहे. स्वत:चे गाव किंवा सासरवाडीचं गाव वगळता खासदाराला कोणतेही गाव निवडता येईल. या माध्यमातून खासदारांनी सुरुवात केल्यास सर्व अडचणी त्यांना प्रत्यक्ष लक्षात येतील आणि त्यानंतर खर्‍या अर्थाने बदल घडायला सुरुवात होईल, असंही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणात या योजनेबद्दल खासदारांना अपील केलं होतं. दरम्यान, पंतप्रधान मोदी 14 ऑक्टोबरला वाराणसीमध्ये जाणार आहेत. तिथे ते पहिल्या पीएम बीएचयु ट्रॉमा सेंटरचं उद्घाटन करणार आहे. या योजने अंतर्गत मोदी ककरहिया गाव दत्तक घेण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतं आहे. त्यामुळे या गावात सध्या रस्तेदुरुस्तीचं काम वेगात सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2014 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close