S M L

‘हुदहुद’ चक्रीवादळ अधिक तीव्र, खबरदारी म्हणून 40 ट्रेन्स रद्द

Samruddha Bhambure | Updated On: Oct 12, 2014 05:06 PM IST

‘हुदहुद’ चक्रीवादळ अधिक तीव्र, खबरदारी म्हणून 40 ट्रेन्स रद्द

11 ऑक्टोबर : ‘हुदहुद’ चक्रीवादळची तीव्रता आता अधिक वाढू लागली आहे. सध्या हे वादळ उत्तरेकडून भारताच्या पुर्व किनारपट्टीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. हे वादळ विशाखापट्टणमच्या किनारपट्टीवर रविवारी दुपारी धडकण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशा सरकारने लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. आंध्रच्या 9 जिल्ह्यांमध्ये, तर ओडिशाच्या 16 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओडिशाच्या 8 जिल्ह्यातील 3 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलं आहे.

चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याच्यावेळी वारे साधारण प्रति तास 160-180 किलोमीटरच्या वेगाने वाहतीलं असं इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे घरांची आणि झाडांची पडझड होऊ शकते आणि जनजीवन विस्कळीत होण्याची ही शक्यता आहे. त्यामुळे आपात्कालीन कृती दल आणि लष्कर सज्ज आहेत. येत्या 24 तासांत हे वादळ अधिक आक्रमक होऊ शकतं असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. दरम्यान, अंदमान, ओडिशा व आंध्र या तीन राज्यांवर याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय. चक्रीवादळामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ओडिशा सरकारने पुर्ण तयारी केली आहे, असा दावा ओडिशा सरकारने केलाय.

दरम्यान, भुवनेश्वर- विशाखापट्टणम दरम्याण 40 एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत, तर 40 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर भुवनेश्वर एअरपोर्टवरच्या भुवनेश्वर-विशाखापट्टणम-चेन्नई, आणि भुवनेश्वर-विशाखापट्टम-बंगलुरू या 2 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2014 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close