S M L

गुहागरमध्ये समुद्राच्या लाटांपासून वीजनिर्मीतीचा प्रयोग यशस्वी

30 मे समुद्राच्या लाटांपासून वीजनिर्मीतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. समुद्राच्या लाटांपासून, वीजनिर्मितीच्या प्रयोगाची देशातली पहिली चाचणी यशस्वी झालीय. गुहागर तालुक्यातल्या बुधलवाडीच्या समुद्रकिना-यावर हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारतोय. अपारंपरिक उर्जामंत्री विनय कोरे यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली. दोन महिन्यानंतर या प्रकल्पातून 25 किलोवॅट नियमित वीज तयार होणार आहे. या वीजेचा दर एक रुपया प्रति युनिट पेक्षाही कमी असणार आहे. समुद्राच्या लाटांपासून वीजनिर्मितीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेली तीन वर्षं अनेक तांत्रिक अडचणींमुळे रखडला होता. यातली मुख्य अडचण होती ती प्रकल्पातील मशिनरीच्या फ्लोटरपर्यंत समुद्राच्या लाटा पोहोचण्याची . यासाठी सुरुंग लावून लाटांना अडसर ठरणारी भिंत फोडण्यात आली त्यामुळे वीज निर्मितीच्या प्रयोगातील मुख्य अडसर दूर झाली आहे. यामुळे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार असून दोन महिन्यानंतर व्यवसायिक पातळीवर ही वीज निर्मिती होणार असल्याचं अपारंपरिक उर्जामंत्री विनय कोरे यांनी सांगितलं आहे. "हा जर प्रयोग आपण कमर्शियल लेव्हलवर यशस्वी करू शकलो तर पर्यावरणाला त्रास न देणारी, कुठल्याही प्रकारचे ग्रीन गॅसेस हवेत न जाऊ देणारी, सातत्यानं इंधनाची आवश्यकता नसणारी आणि एक रुपयापेक्षा प्रत्येक युनिटचा खर्च कमी असू शकणारी अशी अतिशय स्वस्तातली वीज या प्रयोगाद्वारे जगाला उपलब्ध्द करून देऊ शकू, असं अपारंपरिक उर्जामंत्री विनय कोरे म्हणाले. " आपल्या देशासाठी सुटेबल तंत्रज्ञान आपण तयार करावं हा एक विचार असल्यामुळं या प्रयोगात आम्ही दोन फोर्सेस यूज केले. एक बायन्सीचा अपवर्ड थ्रस्ट आणि लाटांचा हॉरीझॉन्टल थ्रस्ट आणि या दोन्हींचा रिझल्टन्ट घेऊन आम्ही इन्क्लाईन प्लेन्स केल्या. अशी माहिती अपारंपरिक उर्जा तंत्रज्ञ तसंच गृहागरमध्ये समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मितीचा प्रयोग राबणा-या गोपाळ बापट यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2009 02:45 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2009 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close