S M L

राम प्रधान समितीचा अहवाल सोपवला मुख्य सचिवांकडे

1 जून26/11 च्या मुंबई हल्ल्यावरचा राम प्रधान समितीचा अहवाल राज्य सरकारने ऍक्शन टेकन रिपोर्टसाठी मुख्य सचिवांकडे सोपवला आहे. पण त्याचवेळी प्रधान समितीच्या एका सदस्याने 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर चुका केल्याचा खुलासा करून राज्य सरकारला अडचणीत टाकलं आहे. दुसरीकडे अहवालाच्या मुद्यावर विधिमंडळाचं कामकाज बंद पाडण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. मुंबई हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलीस कमिशनरांनी दाखवली ढिलाई दाखवली असल्याचा गौप्यस्फोट राम प्रधान समितीचे व्ही. बालचंद्रन यांनी गौप्यस्फोट केला आहे. यात 8 वरिष्ठ अधिकारी आणि इतर 16 अधिकार्‍यांवरही बालचंद्रन यांनी ठपका ठेवला आहे. हल्ल्याच्यावेळी मुंबई पोलिसांच्या तरूण अधिकार्‍यांनी चांगलं काम केलं असं जरी राम प्रधान समितीने स्पष्ट केलं असलं तरी, हा 90 पानी अहवाल आहे. तो ज्या स्वरूपात प्रसिद्ध झाला त्यामुळे सरकार अडचणीत येईल याची जाणीव महाराष्ट्र सरकारला झाली आहे. त्यामुळे हा अहवाल सभागृहात मांडण्याऐवजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या द्वी सदस्यीय समितीकडं सरकारनं सोपवला आहे. राम प्रधान समितीच्या अहवालत व्ही. बालचंद्रन यांनी खुलासा केला आहे. ते म्हणतात अहवाल सादर करताना त्यांना 8 महत्त्वाच्या त्रुटी जाणवल्या. यातल्या काही त्रुटी वरिष्ठ पातळीवरच्या आहेत. तर 16 त्रुटी ह्या सरकारी यंत्रणेतल्या आहेत. तसंच अहवालात त्यांनह 24 महत्त्वाच्या सूचना मांडल्या आहेत. काय म्हणणं आहे व्ही. बालचंद्रन यांचं - व्ही. बालचंद्रन हे रामप्रधान समितीचे दुसरे सदस्य आहेत. रॉचे वरीष्ठ अधिकारी बी. रामन यांना लिहिलेलं पत्र Rediffmail.com च्या या वेबसाईटवर ब्लॉगच्या स्वरूपात प्रसिद्ध झालं आहे. त्या पत्रातले काही महत्त्वाचे मुद्दे व्ही. बालचंद्रन यांचा खुलासा - किमान प्राथमिक नियंत्रणाचा अभाव.वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी संपर्काचा अभाव.कामा हॉस्पिटलमध्ये जरुरीपेक्षा जास्त अधिकारी.एके सत्तेचाळीस रायफल्सचा पुरेपूर वापर नाही.पोलीस कमिशनरांनी योग्य सूत्र हलवली नाहीत.अशा हल्ल्यांच्यावेळी किमान प्राथमिक नियंत्रण प्रक्रियाही पार पाडली गेली नाही.त्यामुळे पोलीस अधिकारी स्वतःच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेत होते. आपल्या वरिष्ठांशी ते या निर्णयाच्या वेळी सतत संपर्कात नव्हते. कामा हॉस्पिटलमध्ये जरुरीपेक्षा जास्तच वरिष्ठ अधिकारी होते, त्याचा परिणाम म्हणून हेमंत करकरे आणि अशोक कामटे यांना गमवावं लागलं.शीघ्र कृती दलाने एक तास उशीर केला.पोलीस दलातील एके 47 ची संख्या 270 आहे. पण त्यापैकी अतिशय कमी हल्ल्याचा प्रतिकार करताना वापरण्यात आल्या.तसंच पोलीस कमिशनरांनी प्रत्यक्ष हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन निर्देश देण्याऐवजी एका ठिकाणाहूनच सूत्र हलवली त्यावरही श्टीका करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2009 04:26 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2009 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close