S M L

डिझेल स्वस्त होणार ?

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2014 02:35 PM IST

Petrol16 ऑक्टोबर : विधानसभा निकालाच्या धाकधुकीत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. दिवाळीच्या तोंडावर डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. डिझेलचे दर 3 रुपये 53 पैशांनी स्वस्त होण्याची चिन्ह आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर कमी झाल्यामुळे देशातल्या डिझेल कंपन्या फायद्यात आल्या आहेत. सध्या तेल कंपन्यांना लीटरमागे 3.56 रुपयांचा फायदा होतोय. सध्या जागतिक बाजारपेठात तेलाचे दर कोसळून सध्या कच्च्या तेलाच्या बॅरलमागे 80.88 डॉलर इतका कमी झालाय. अमेरिका, युरोप आणि चीनमध्ये तेलाची मागणी घटल्यामुळे तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून डिझेलच्या दरात प्रतिमहा 50 पैशांनी वाढ होत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 16, 2014 10:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close