S M L

अभिभाषणात राष्ट्रपतींनी दिला अंतर्गत सुरक्षेबरोबरच लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर

4 जून राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांसामोर संयुक्त सभेला संबोधित करून अभिभाषण केलं. आज त्यांनी नवनिर्वाचीत खासदारांचं अभिनंदन करत अभिभाषणाला सुरुवात केली. आपल्या अभिभाषणात त्यांनी मनमोहन सरकारचा अंजेडा मांडला. यात त्यांनी सरकारच्या 10 प्रमुख योजना सभागृहापुढे ठेवल्या. अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याबरोबरच लष्कराच्या आधुनिकीकरणावर सरकार भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर कृषी क्षेत्रात सरकार अधिक गुंतवणुक करणार असून, शेतक-यांची कर्ज माफ केली जातील. ग्रामीण विकास योजनाचा विस्तारकरण्यात येणार आहे. तसंच पाकिस्तानशी संबंध सुधारण्यास सरकार प्रतिबद्ध असल्याचं त्यांनी आपल्या अभिभाषणात सांगितलं. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी लोकसभेत नुकतंच काही महत्त्वाच्या आर्थिक बाबींवर सरकाचे निर्णय काय असतील याचे संकेत दिलेत. त्यांनी त्यांच्या अभिभाषणात सरकारच्या ऍक्शन प्लॅनची रुपरेखा मांडलीय. देशात परकिय गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जाईल असं त्यांनी जाहीर केलं आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी सरकार खर्चाची मर्यादा वाढवेल असंही त्यांनी सांगितलं. तसंच पीएसयू सेक्टर कंपन्यांमध्ये सरकारचा 51 टक्के हिस्सा कायम राहील हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारी बँकांना आर्थिक मदतीचं पॅकेज पुरवलं जाईल असंही त्यांनी सांगितलंय. सरकारी कंपन्याचं लिस्टींग केलं जाईल असंही राष्ट्रपतींनी सुचित केलं आहे. तसंच कृषी क्षेत्र, ऑईल अँड गॅस संशोधन, कोळसा अशा काही क्षेत्रांमध्ये सुधारणांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. खाद्यान्न सुरक्षा कायद्याची फेररचना केली जाईल असंही त्या म्हणाल्यात. ग्रामीण भागात दूरसंचार संपर्काचं जाळं 40 टक्क्यांपर्यंत वाढवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. पेन्शन रेग्युलेशन लॉवर सरकार निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय . नव्या पब्लिक प्रायव्हेट प्रोजेक्ट्सना सरकारतर्फे वेग दिला जाईल असं प्रतिभाताई म्हणाल्यात. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यांच्या अभिभाषणात सांगितलेले मुद्दे पुढीलप्रमाणे - अंतर्गंत सुरक्षा लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर देणारकृषी क्षेत्रात सरकारी मदत आणि कर्जमाफीग्रामीण विकास योजनेचा विस्तारप्रत्येक नागरिकाला ओळखपत्र देणाररोजगारासाठी सरकारकडून विशेष प्रयत्नहाऊसिंग, इन्फास्ट्रकचरवर भर देणारराज्यांना जादा निधी देणारएक रँक एक पेन्शन योजनामहिला आरक्षण बिल राष्ट्रीय आरोग्य विमा योजनासर्व शिक्षा अभियानाचा विस्तारपाकिस्तानशी संबंध सुधारणार3 रुपये किलोने तांदूळ देणार

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2009 01:36 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2009 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close