S M L

दिवाळी भेट, डिझेल 3.37 रुपयांनी स्वस्त

Sachin Salve | Updated On: Oct 18, 2014 08:56 PM IST

दिवाळी भेट, डिझेल 3.37 रुपयांनी स्वस्त

disel5418 ऑक्टोबर : महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने 'बोनस' दिलंय. तब्बल 5 वर्षांनंतर डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. डिझेलचे दर प्रतिलिटर 3.37 पैशांनी स्वस्त होणार आहे.

डिझेलच्या नव्या किंमती शनिवारी मध्यरात्री पासून लागू होणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. परंतु यापुढे आता डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय तेल बाजाराच्या किंमतींवर अवलंबून राहणार आहेत.

केंद्र सरकारने डिझेलच्या किंमती नियंत्रणमुक्त केल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला डिझेलवर कोणतीही सबसिडी द्यावी लागणार नाही. डिझेलच्या दरात कपात करण्यासाठी केंद्र सरकारने दोन दिवसांपासून हालचाल सुरू केली होती अखेरीस आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 18, 2014 08:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close