S M L

राज्यात दिवाळीनंतरच नवं सरकार?

Samruddha Bhambure | Updated On: Oct 21, 2014 03:56 PM IST

राज्यात दिवाळीनंतरच नवं सरकार?

21 ऑक्टोबर : महाराष्ट्रात भाजपच्या मुख्यमंत्र्यांपदाची निवड दिवाळीनंतर होणार असल्याचं, आज (मंगळवारी) केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितलं आहे.

दिवाळीनंतर आपण महाराष्ट्रात जाणार असल्याचं, सांगत राजनाथसिंह यांनी विधिमंडळ नेत्याची निवड दिवाळीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी कोणाची मदत घ्यावी, यासाठी भाजपला आणखी वेळ मिळणार आहे. त्यामुळे आता पडद्यामागच्या हालचालींना वेग आला आहे.

एकीकडे भाजप आणि शिवसेना एकमेकांचा अंदाज घेतं आहेत तर दुसरीकडे विजयोत्सवासाठी काल मुंबईत आलेले भाजपचे नवनिर्वाचित आमदार दिवाळीसाठी पुन्हा आपापल्या मतदार संघात परतू लागले आहेत. भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक केव्हा होणार हे अजुनही स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे यंदाची दिवाळी सरकारविनाच होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजपच्या निरीक्षक मंडळातील राजनाथ सिंह आणि जे पी नड्डा आज मुंबई दौर्‍यावर येणार होते. मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्यानं मुख्यमंत्रिपदाच्या निवडीचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2014 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close