S M L

शिवडी न्हावा-शेवा सी लिंकमुळे फ्लेमिंगोंचं अस्तित्व धोक्यात

5 जून शिवडी न्हावा-शेवा सी लिंकमुळे जसा पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे तसा फ्लेमिंगोंच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. कारण मुंबईतल्या शिवडी बंदराच्या भागात हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो येतात. खरं तर शिवडी-माहुलच्या खाडीच्या परिसरात हे पक्षी गेल्या 21 वर्षांपासून येत आहेत. एमएसआरडीसी म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने थेट या फ्लेमिंगोंच्या डोक्यावरूनच सागरी पूल बांधण्याचा घाट घातला आहे. जेव्हा शिवडी न्हावा-शेवा सी लिंकचा प्लॅन आखला गेला तेव्हा त्यात साधा या फ्लेमिंगोंचा साधा उल्लेखही केला गेला नव्हता. पण जेव्हा कॉन्झर्वेशन ऍक्शन ट्रस्टसारख्या संस्थांनी याचा पाठपुरावा केला. तेव्हा कुठे एमएसआरडीसीला जाग आली आणि या भागाचा त्यांनी शास्त्रीय अहवाल बनवून घेतला. त्या शास्त्रीय अहवालात या पुलामुळे फ्लेमिंगोंना धोका पोहोचू शकतो. हे यात स्पष्टपणे म्हटलं आहे. पण या अहवालानंतरही एमएसआरडीसीला याचं महत्त्व पटलेलं दिसत नाही. हा पूल आणि फ्लेमिंगोंबाबत एमएसआरीडीसी आणखी एक यु टर्न घेतला आहे. हा पूल आम्ही आधी तयार करू आणि नंतर तो इथे नेऊन बसवू. त्यामुळे फ्लेमिंगोंना काहीच धक्का पोहोचणार नाही. असा त्यांचा दावा आहे. पण हाही पर्याय एसआरडीसीला मान्य नाही. पुलाच्या आखणीत काहीही बदल होणार नाही, एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट सांगितलं. यासगळ्या वादात फ्लेमिंगोच्या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्षच होत आहे.मुंबईच्या बेटांमध्ये जी लिंक निसर्गानं केली नव्हती ती आम्ही जोडतोय, असं एमएसआरडीसीचं म्हणणं आहे. एमएसआरडीसीची नवी सी-लिंक महानगरीच्या गाड्यांना वेग देणार आहे. नवी मुंबई सेझसीठी फायदेशीर ठरेल. पण, या फ्लेेमिंगोंची आणि शहराची लिंक तोडेल. आणि यावर्षीचं कदाचित शेवटचं स्थलांतर असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2009 04:44 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2009 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close