S M L

पंतप्रधानांची दिवाळी सियाचीनमधील जवानांसोबत

Samruddha Bhambure | Updated On: Oct 23, 2014 02:50 PM IST

पंतप्रधानांची दिवाळी सियाचीनमधील जवानांसोबत

23 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपली दिवाळी सियाचीनमध्ये सीमेवर देशाची सुरक्षा करणार्‍या जवान आणि काश्मीरमधल्या पूरग्रस्तांसोबत साजरी करणार आहेत. त्यासाठी ते काश्मीरला रवानाही झाले आहेत. दौर्‍याच्या सुरुवातीला मोदी सियाचीनमधल्या जवानांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहेत.

सियाचीन हे जगातलं सर्वात उंच आणि सर्वाधिक थंडी असलेली युद्धभूमी आहे. अशा ठिकाणी काम करणे हे जवानांसाठी एक मोठ आव्हान असून मातृभूमीच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून काम करणार्‍या जवानांना मी सलाम करतो अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.

तसंच कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण देश जवानांच्या सोबत असल्याचा निरोप घेऊन, मी जवांनाना भेट देत आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे. याशिवाय दिवाळीसारख्या मुहूर्तावर जवानांना भेटायला मिळणं, हे माझं सौभाग्य आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे. त्यानंतर ते श्रीनगरमध्ये पुरग्रस्तांना भेट देतील तसेच काही छावण्यांनाही भेटी देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

पंतप्रधानांचा कार्यक्रम

  • पंतप्रधान 10 वाजता सियाचीनला निघतील
  • 12 वाजता श्रीनगरला पोहचतील
  • राजभवनात प्रस्थान
  • पूरग्रस्तांची राजभवनात भेट
  • पूरग्रस्तांच्या छावण्यांना भेट
  • पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन आणि मदतीच्या पॅकेजची घोषणा करणं अपेक्षित
  • 6 वाजेपर्यंत दिल्लीला परत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2014 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close