S M L

मोदींच्या स्नेहभोजनाला सेनेचे खासदार जाणार, भाजप-सेना एकत्र येणार?

Sachin Salve | Updated On: Oct 23, 2014 08:57 PM IST

31udhav thakare_and_modi23 ऑक्टोबर : येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिवाळी निमित्त एनडीएच्या सर्व खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलंय. या स्नेहभोजनासाठी आता शिवसेनेचे सर्व खासदार हजर राहतील, असं शिवसेना नेते अनिल देसाई यांनी स्पष्ट केलंय.

विधानसभेत घवघवीत यश आणि दिवाळी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सर्व शिलेदारांसाठी स्नेहभोजनाचा आयोजन केलं आहे. 26 तारखेला होणार्‍या पंतप्रधानांच्या स्नेहभोजनाचं निमंत्रण शिवसेनेच्या खासदारांना देण्यात आलेलं नाही. एनडीएतल्या इतर मित्रपक्षांना निमंत्रणं देण्यात आली आहेत. राज्यातल्या सरकार स्थापनेला खर्‍या अर्थाने 26 तारखेनंतरच सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांचनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांची भेट घेतली होती. शिवसेनेचा बिनशर्त पाठिंबा असले असा निरोप देसाई यांनी दिला होता. सोमवारनंतर सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरू होईल असं देसाई यांनी स्पष्ट केलं होतं. पण आदल्यादिवळी 26 तारखेला पंतप्रधानांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलंय. सुरुवातीला शिवसेनेच्या खासदारांपर्यत या स्नेहभोजनाचं निमंत्रण पोहोचलं नव्हतं. त्यामुळे सेना-भाजपच्या सबंधांबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या आता अनिल देसाई यांच्या या स्पष्टीकरणानंतर सेना-भाजपच्या एकत्र येण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2014 08:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close