S M L

पाकची मुजोरी सुरूच, मोदी काश्मीर भेटीवर असताना सीमारेषेवर पुन्हा गोळीबार

Sachin Salve | Updated On: Oct 23, 2014 09:03 PM IST

pakistan violates ceasefire again-8388923 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपली दिवाळी सियाचिनमधले जवान आणि काश्मीरमधल्या पुरग्रस्तांसोबत साजरी करत आहेत. पण पाकिस्तानच्या कुरापत्या सुरूच आहे.

नरेंद्र मोदी काश्मीर दौर्‍यावर असतानाच पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केलाय. आज सकाळी हा गोळीबार झाला.

या महिन्यात पाकिस्तानकडून सुमारे 12 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय. पाक सैनिकांनी सीमारेषेवरील गावावर गोळीबार केला यात 12 जणांचा मृत्यू झाला. भारतीय सैनिकांनीही पाकला सडेतोड उत्तर दिले होते पण तरीही पाकची मुजोरी सुरूच आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2014 08:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close