S M L

मुंबईसह दोन विमानतळांवर हायअलर्ट

Samruddha Bhambure | Updated On: Oct 24, 2014 07:44 PM IST

मुंबईसह दोन विमानतळांवर हायअलर्ट

24 ऑक्टोबर :  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशातील विमानांना लक्ष्य करण्याचा कट अतिरेक्यांनी रचल्याचं समोर आलं आहे. गुप्तचर विभागाला मिळालेल्या एका निनावी पत्रानंतर देशातल्या तीन विमानतळांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई, अहमदाबाद आणि कोच्ची विमानतळांचा समावेश आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अहमदाबादहून मुंबईच्या दिशेने उड्डाण करणार्‍या आणि 25 तारखेच्या पहाटे मुंबईहून कोच्चीला उड्डाण करणार्‍या विमानांच अपहरण करण्याचा कट अतिरेकी संघटनांनी आखल्याची माहिती गुप्तचर विभागाला एका निनावी पत्राद्वारे मिळाली आहे. या पत्रानंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला असून तीनही विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर या दोन्ही दिवशी प्रवाशांनी विशेष काळजी घेऊन प्रवास करण्याचं आवाहन, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि नागरी उड्डाण सुरक्षा विभागाने केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2014 06:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close