S M L

'स्वच्छ भारत' जनजागृतीसाठी माध्यमं महत्त्वाची - मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Oct 25, 2014 03:27 PM IST

'स्वच्छ भारत' जनजागृतीसाठी माध्यमं महत्त्वाची - मोदी

25 ऑक्टोबर :  'स्वच्छ भारत' अभियानाबाबत जागृती निर्माण करण्यात प्रसारमाध्यामांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगत, प्रसारमाध्यमांमुळेच 'स्वच्छता अभियान' ही सरकार आणि नागरिकांची एकत्रित जबाबदारी असल्याच्या संकल्पनेला बळ मिळाल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. दिल्लीत भाजप मुख्यालयात दिवाळीनिमित्त आयोजित 'दिवाळी मिलन' या कार्यक्रमात पंतप्रधानांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिकरित्या संवाद साधला. या कार्यक्रमाला भाजपाध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह भाजपाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

गेल्या महिन्याभरापासून आपण 'स्वच्छ भारत अभियाना'बाबतचे लिखाण वाचत असून पत्रकारांनी स्वच्छता, आरोग्यावर सातत्याने लेख लिहिले. यामुळेच स्वच्छतेचा विषय चर्चेत राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सरकार, जनताही जागृत झाली असून ही एकप्रकारे देशसेवाच आहे असे सांगत मीडियामध्ये देश घडवण्याची मोठी ताकद असते, असे ते म्हणाले. फक्त हातात झाडू घेऊन सफाई करायला लागणेच महत्त्वाचे नाही, तर पत्रकारांची लेखणी हीसुद्धा एक प्रकारची केरसुणी आहे, असंही त्यांनी म्हटलं. ही लेखणीसुद्धा स्वच्छतेचं साधन बनली आहे, अशी शब्दांत त्यांनी मीडियाचं कौतुक केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 25, 2014 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close