S M L

जम्मू- काश्मिर आणि झारखंडमध्ये पाच टप्प्यांत निवडणुका

Samruddha Bhambure | Updated On: Oct 25, 2014 08:13 PM IST

जम्मू- काश्मिर आणि झारखंडमध्ये पाच टप्प्यांत निवडणुका

25 ऑक्टोबर :  जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. जम्मू- काश्मिर आणि झारखंड येथे पाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून 23 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, असे निवडणूक आयोगाने शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेतील 87 जागांसाठी तर झारखंडमधील 81 जागांसाठी मतदान होणार आहे. पहिला टप्पा 25 नोव्हेंबरला होणार आहे तर शेवटचा टप्पा 20 डिसेंबरला होंणार आहे. दोन्ही राज्यात 25 नोव्हेंबर, 2 डिसेंबर, 9 डिसेंबर, 14 डिसेंबर आणि 20 डिसेंबर अशा पाच टप्पात मतदान होणार आहे. तर 23 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असल्याचं आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. दिल्लीतल्या 3 जागांच्या पोटनिवडणुकाही 25 नोव्हेंबरला हाणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 25, 2014 08:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close