S M L

मोदींसोबत उद्धव ठाकरेंची 'चाय पे चर्चा' नाही

Sachin Salve | Updated On: Oct 26, 2014 06:05 PM IST

मोदींसोबत उद्धव ठाकरेंची 'चाय पे चर्चा' नाही

26 ऑक्टोबर : दिवाळीचे फटाके फुटल्यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालीना वेग आलाय. याची पहिली सुरुवात ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'चाय पे चर्चे'पासून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज(रविवारी) एनडीएच्या सर्व खासदारांसाठी चहापान आयोजित केलंय. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नाहीत हे आता स्पष्ट झालंय.

विधानसभेत घवघवीत यश आणि दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सर्व शिलेदारांसाठी स्नेहभोजन आणि चहापानचं आज आयोजन केलंय. पंतप्रधानांनी दिल्लीतील सेव्हन रेसकोर्स या  निवासस्थानी सर्व खासदारांना आमंत्रित केलंय. शिवसेनेचे खासदारही या चहापानाला उपस्थित राहणार आहेत. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गैरहजर राहणार आहे. या चहापानाच्या निमित्तानं शिवसेना आणि भाजप यांच्यात मनोमीलन होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एनडीए सत्तेत आल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच खासदारांसाठी चहापान आयोजित केलंय. दरम्यान, उद्धव ठाकरे खासदार नसल्यामुळे ते चहापानाला येणार नाहीत आणि सेना भाजपमध्ये काही तणाव नाही असं स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी दिलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2014 03:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close