S M L

अखेर युतीचा राग चहाच्या कपात विरघळला

Sachin Salve | Updated On: Oct 26, 2014 08:38 PM IST

अखेर युतीचा राग चहाच्या कपात विरघळला

26 ऑक्टोबर : 25 वर्षांचा संसार मोडल्यानंतर भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले होते पण सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्ष कटुता विसरून एकत्र येण्याची चिन्ह आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएतील खासदारांसाठी चहापानाचं आयोजन केलं होतं. या चहापानासाठी शिवसेनेचे खासदारांनी उपस्थित राहून युतीत निर्माण झालेला राग चहाच्या कपात विरघळला असं दाखवून दिलं. त्यामुळे येत्या दोन दिवसांत याचे परिणाम दिसून येतील का ? हे पाहण्याचं ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आपल्या सेव्हन रेसकोर्स येथील निवास्थानी चहापानाचं आयोजन केलं होतं. यासाठी एनडीएच्या सर्व घटक पक्षांना बोलवण्यात आलं होतं. सुरुवातील सेनेला निमंत्रण देण्यावरुन सस्पेन्स निर्माण झाला होता. मात्र अखेरीस सेनेनं आपले खासदार चहापानाला जातील असं स्पष्ट केलं. अखेर आजच्या चहापानाला सेनेकडून अनंत गीतेंसह सेनेचे खासदार उपस्थित होते. चहापानाच्या या कार्यक्रमात एनडीएच्या काही मंत्र्यांनी महत्त्वाच्या योजनांची माहिती देण्यासाठी प्रेझेंटेशनही केलं. याशिवाय स्वच्छ भारत अभियानाबद्दलही या चहापानाच्या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. मोदींनी यावेळी स्वच्छ भारत अभियानअंतर्गत गाव दत्तक घेऊन त्यांचा विकास कसा करता येईल याबद्दल चर्चा केली. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्रत्येक खासदाराला तीन गाव दत्तक घ्यायची अशी योजना आहे. याची पुन्हा आठवण करून देण्यात आली. या चहापानाच्या कार्यक्रमाला भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रमुख नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीही उपस्थित होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2014 08:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close