S M L

काळ्या पैशांप्रकरणी तीन नावं उघड

Samruddha Bhambure | Updated On: Oct 27, 2014 03:04 PM IST

काळ्या पैशांप्रकरणी तीन नावं उघड

27 ऑक्टोबर : काळ्या पैशाविषयी केंद्र सरकारने आज सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं असून त्यामध्ये तिघांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, यापैकी कोणीही राजकीय नेता नाही, तर व्यावसायिक आहेत. या यादीत डाबर ग्रुपचे संचालक प्रदीप बर्मन, राजकोटचे सोन्या-चांदीचे व्यापारी पंकज चिमणलाल लोढिया आणि गोव्यातील खाणमालक राधा टिंबोला यांचा समावेश आहे.

काळ्या पैशाबाबत भविष्यात केंद्र सरकारकडून आणखी 138 जणांची नावे न्यायालयात सादर करण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रतिज्ञापत्रावरून वाद निर्माण झाला आहे. डाबर ग्रुप आणि लोढिया यांनी स्वत:वरचे आरोप फेटाळले आहेत. प्रदीप बर्मन NRI असताना हे खातं उघडण्यात आलं होतं आणि असं करायला कायदेशीर परवानगी आहे. आम्ही कायद्याचं पालन केलेलं आहे आणि स्वतःहून कायद्यानुसार आम्ही याचा तपशील आयकर विभागाला दिलेला आहे, असा खुलासा डाबर ग्रुपनं एका निवेदनातून केला आहे.

आम्ही सर्व कर भरले आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. म्हणूनच परदेशी बँकेत खातं असणार्‍या प्रत्येक व्यक्तीची काळा पैसाधारक म्हणून गणना होणं दुदैर्वी आहे, असं डाबर ग्रुपने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या यादीतली सर्व नावे उघड व्हावीत अशी मागणी राजकीय नेत्यांनी केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2014 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close