S M L

देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2014 10:53 PM IST

देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

27 ऑक्टोबर : देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री निवड झाल्यानंतर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतं आहेत. भाजपच्या सर्वच नेत्यांनी फडणवीस यांचं अभिनंदन केलंय. फडणवीस हे दुरदृष्टी असणार नेते असून मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम आहेत. देवेंद्र यांच्या पाठीमागे भाजपची सगळी शक्ती उभी करू अशी प्रतिक्रिया भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी यांनी दिली. तसंच गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वखाली महाराष्ट्र प्रगती करेल अशी आशा व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात त्यातील हे निवडक ट्विट

अमित शहा

-'देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन. महाराष्ट्र हे महान राज्य

-त्या राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान देवेंद्र यांना मिळतोय'

शाहनवाज हुसेन

-'विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल फडणवीस यांचं अभिनंदन, देवेंद्रना शुभेच्छा'

आनंदीबेन पटेल-

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा

भाजपच्या कर्तृत्ववान तरुणाईचं देवेंद्र प्रतिनिधीत्व करतात

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर

- मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा

- अत्यंत सकारात्मक व्यक्तिमत्त्व

- तरुण आणि प्रामाणिक व्यक्तीकडे महाराष्ट्राची धुरा गेलीय

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2014 08:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close