S M L

काळ्या पैशांप्रकरणी 627 जणांची नावं सादर

Samruddha Bhambure | Updated On: Oct 29, 2014 12:01 PM IST

काळ्या पैशांप्रकरणी 627 जणांची नावं सादर

29  ऑक्टोबर : काळ्या पैशांप्रकरणी केंद्र सरकारने आज (बुधवारी) सुप्रीम कोर्टाला 627 जणांच्या नावाची यादी सोपवली आहे. केंद्र सरकारने तीन सीलबंद लिफाफ्यांमध्ये ही यादी सादर रेली आहे. या यादीत कोणाची नावे आहेत, यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

परदेशी बँकांमध्ये काळा पैसा ठेवणार्‍या सर्व खातेधारकांची नावं जाहीर करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर आज केंद्र सरकारने ही यादी सीलबंद लिफाफ्यात सुप्रीम कोर्टाला सोपवली आहे. यात खातेधारकांची नावं, अकाऊंट नंबर आणि खात्यातली रक्कम याची माहिती देण्यात आली आहे. ही सर्व 627 नावं जिनिव्हामधल्या एचएसबीसी बँकेच्या शाखेतल्या खातेधारकांची असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काळा पैसा बँकेत ठेवणार्‍यांच्या नावाची चौकशी केंद्र सरकार नाही तर एसआयटी करणार असल्याचंही सप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. तसंच हा लिफाफा न उघडण्याची ग्वाही देत, सुप्रीम कोर्टाने हे सीलबंद लिफाफे खोलण्याचे सर्व अधिकार फक्त एसआयटीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनाच आहेत. सुप्रीम कोर्टाने एसआयटीला पुढच्या महिन्यात स्टेटस रिपोर्ट सादर करायला सांगितला असून 31 मार्च 2015 पर्यंत सर्व चौकशी पूर्ण करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने एसआयटीला दिले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2014 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close