S M L

अखेर राष्ट्रपतींनी केली दिल्ली विधानसभा विसर्जित

Sachin Salve | Updated On: Nov 5, 2014 11:24 PM IST

prnab da05 नोव्हेंबर : दिल्लीत अखेर पुन्हा विधानसभा निवडणूक होणार आहे. आज (बुधवारी) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्ली विधानसभा विसर्जित केल्याचं जाहीर केलंय.त्याचबरोबर नव्या निवडणुकांची तयारी करण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने निवडणूक आयोगाला दिल्या आहेत.

दिल्ली भाजपची निवडणूक व्यवस्थापन समितीची उद्या याबद्दल बैठक आयोजित करण्यात आली आहे. दिल्ली निवडणुकीत भाजपचा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार असल्याची तयारी भाजपने सुरू केलीये.

तर काँग्रेसही तयारी लागलीये. पण काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर आपनेही तयारी सुरू केली असून आपची खरी कसोटी लागणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2014 11:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close