S M L

'राज्यापेक्षा देश मोठा',पर्रिकरांनी संरक्षण मंत्रिपद स्वीकारलं

Sachin Salve | Updated On: Nov 6, 2014 11:27 PM IST

'राज्यापेक्षा देश मोठा',पर्रिकरांनी संरक्षण मंत्रिपद स्वीकारलं

06 नोव्हेंबर : हो नाही म्हणत अखेर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी 'राज्यापेक्षा देश मोठा' असं म्हणत केंद्राची ऑफर स्वीकारली आहे. केंद्रात मंत्रिपद स्वीकारण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन पर्रिकरांनी स्वीकारलंय. त्याबद्दल त्यांना पक्षाकडुनही आदेश देण्यात आले होते. लवकरच मनोहर पर्रिकर दिल्लीला रवाना होणार आहे. त्यापुर्वी ते उद्या सकाळी गोव्यात आमदारांची बैठक घेणार आहेत. आता पर्रिकर हे देशाचे नवे संरक्षणमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले असून औपचारिक घोषणा बाकी आहे.

मोदी सरकारने आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाल सुरू केली. गोव्याचे मुख्यंमत्री मनोहर पर्रिकर यांची संरक्षण मंत्रिपदवर बढती मिळण्याची शक्यता वर्तवली गेली. बुधवारी रात्री पर्रिकर यांना तातडीने दिल्लीलाही बोलावण्यात आल्यामुळे शक्यता आणखी बळावली. पर्रिकर यांनी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली. पण पर्रिकरांनी आपण गोव्यातच राहणार असं स्पष्ट केलं होतं. पण नरेंद्र मोदींनी पर्रिकर यांना संरक्षण मंत्रिपद स्वीकारण्याचे आदेश दिल्यानंतर पर्रिकर यांनी होकार दिलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होण्याची शक्यता आहे. नव्या मंत्र्यांचा रविवारी शपथविधीही होऊ शकतो. त्यावेळी पर्रिकरही संरक्षण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. पर्रिकर यांच्यासह आणखीही काही मंत्र्यांचा सहभाग होणार आहे. यात महाराष्ट्रातून चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. अहिर यांनीच कोळसा घोटाळा उघड केला होता. अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडचा संरक्षण मंत्रालयाचा भार कमी करून तो गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे दिला जावू शकतो. तसंच माजी अर्थमंत्री यशवंत सिंन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा तसंच राजस्थान आणि हरियाणामधून जाट नेत्यांनाही संधी दिली जावू शकतो. सध्या काही केंद्रीय मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खाती आहेत. त्या मंत्र्यांकडचा भार या विस्तारात कमी करण्यात येणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2014 07:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close