S M L

मोदींनी वाराणसीतील जयापूर गाव घेतलं दत्तक

Sachin Salve | Updated On: Nov 7, 2014 02:03 PM IST

मोदींनी वाराणसीतील जयापूर गाव घेतलं दत्तक

pm modi in jayapur07 नोव्हेंबर : 'गंगा माँ ने बुलाया हैं' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि विक्रमी मताधिक्यांनी विजयीही झाले. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी आज पहिल्यांदाच वाराणसीत दाखल झाले. नरेंद्र मोदी आपल्याच मतदारसंघातलं जयापूर हे गाव ते दत्तक घेतलं आहे. आदर्श ग्राम योजनेअंतर्गत मोदींनी हे गाव दत्तक घेतलंय.

यावेळी मोदींनी जयापूरच्या नागरिकांशी संवाद साधला. जयापूर हे गाव खासदार म्हणून मी दत्तक घेत नाहीये तर या गावानेच एका खासदाराला दत्तक घेतलंय असं म्हणत मोदींनी जयापूरच्या विकासासाठी काय काय करता येईल यासाठी जयापूरवासींयाकडून सुचना मागवल्या आहेत. तसंच घरात मुलगी झाली तर आपण तो क्षण साजरा केला पाहिजे. त्यात दुखी होण्यासारखं काहीही नाही. उलट मुलगी होणं ही आनंदाची गोष्ट आहे, असंही यावेळी मोदी म्हणाले. जयापूर दौर्‍यानंतर त्यांनी वाराणसी शहराजवळच्या लालपूरमध्ये एका टेक्सटाईल व्यापारी केंद्राचंही भूमिपूजन केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2014 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close