S M L

विमानाला धडकली म्हैस

Sachin Salve | Updated On: Nov 7, 2014 06:34 PM IST

विमानाला धडकली म्हैस

07 नोव्हेंबर : गुजरातमधील सुरतच्या विमानतळावर गुरुवारी संध्याकाळी विमानाने उड्डाणासाठी रनवेवर धाव घेतल्यानंतर एक म्हैस येऊन धडकल्यामुळे खळबळ उडाली. पायलटने प्रसंगावधान राखून तातडीने विमानाचे लँडिंग रोखले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

विमानतळाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सात वाजता सुरत विमानतळावर स्पाईस जेटचे एससी 622 विमान उड्डाणासाठी रनवेवर धाव घेतली. पण अचानक एक तीन म्हैशी रनवेवर आल्यात त्यातील एक म्हैस विमानाला येऊन धडकली. त्यातच जागीच तिचा मृत्यूही झाला. तसंच विमानाचंही थोडं नुकसान झालं, मात्र वेळेवर पायलटने वेळीच टेकऑफ थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुत्रांच्या माहितीनूसार, या दुर्घटनेनंतर स्पाईस जेटने काही काळ आपल्या विमानांच्या उड्डाणावर बंदी आणली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2014 06:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close