S M L

अखेर 'त्या' घुसखोराला अटक

Sachin Salve | Updated On: Nov 7, 2014 08:49 PM IST

अखेर 'त्या' घुसखोराला अटक

anil_mishra07 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यातील घुसखोराला अखेर अटक करण्यात आली आहे. अनिल मिश्रा असं या व्यक्तीचं नाव आहे. पंतप्रधानांचं सुरक्षा कवच भेदल्याचा त्याच्यावर आरोप आहे. भाजपच्या मुंबईच्या बिहार विभागाचा स्वयंघोषित प्रमुख म्हणवणार्‍याअनिल मिश्राला 11 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या वेळी सुरक्षिततेचा भंग करणारी धक्कादायक गोष्ट मुंबई पोलिसांच्या लक्षात आली. मुंबई भाजपच्या बिहार सेलमधला स्वयंघोषित सदस्य असलेला अनिल मिश्रा हा भाजपच्या बड्या नेत्यांसोबत व्यासपीठावर दिसला होता. अनिल मिश्रानं पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यासोबत फोटोही काढलेत. इतकंच नाही तर शपथविधी सोहळा सुरू असतानाही अनिल मिश्रा व्यासपीठावर दिसला होता. धक्कादायक म्हणजे या अनिल मिश्रांचं नाव व्यासपीठावर किंवा व्हीव्हीआयपी अशा कोणत्याही यादीत नव्हतं, असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय. इतकंच नाही तर अनिल मिश्राला प्रवेशाचा पासही देण्यात आला नव्हता, असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. अखेर ही बाब उघड झाल्यानंतर पोलिसांनी अनिल मिश्राला अटक केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2014 08:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close