S M L

दहशतवादविरोधात कडक पावलं उचला : मनमोहन सिंग यांनी झरदारींना ठणकावलं

16 जून अतिरेक्यांच्या कारवायांसाठी पाकिस्तानने आपल्या भूमीचा वापर करू देऊ नये, असं मनमोहन सिंग यांनी झरदारींना ठणकावलं आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्यात मंगळवारी रशियाच्या येकात्रिन-बर्गमध्ये बैठक झाली. मुंबई हल्ल्यानंतर दोन देशांत झालेली ही पहिलीच उच्चस्तरीय बैठक होती. दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये लवकरच बैठक घेण्याचा निर्णय यावेळी झाला.पाकिस्तानने या बैठकीचं स्वागत केलं आहे आणि दोन्ही देशांतली थांबलेली शांतता चर्चा पुन्हा सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज मोहम्मद सईद याच्या सुटकेच्या विरोधात याचिका दाखल करू, असं पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितलं. दरम्यान, मनमोहन सिंग आणि झरदारी पुढच्या महिन्यात इजिप्तमध्ये होणार्‍या अलिप्तवादी राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्तानं पुन्हा भेटणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये सप्टेंबर 2008 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या निमित्ताने पंतप्रधान आणि झरदारी एकमेकांना भेटले होते. हीच त्यांची शेवटची भेट होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2009 06:06 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2009 06:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close