S M L

शिवसेना विरोधी बाकावर बसण्याची शक्यता

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2014 12:46 PM IST

शिवसेना विरोधी बाकावर बसण्याची शक्यता

08 नोव्हेंबर  :शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची चिन्ह आहे शिवसेनेनं अखेर विरोधीबाकावर बसण्याचा स्वाभिमानी निर्णय घेतल्याचा सूत्रांनी सांगितलं. सेनेनं विरोधी पक्षात बसण्याची तयारी केली असून उद्या संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे तसंच  या बैठकीतच विरोधी पक्ष नेता निवडला जाईल अशी माहितीही सूत्रांनी दिली.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली. शिवसेनेच्या आमदारांनी सकाळी बैठक घेतली. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतर भाजपकडून शिवसेना ऑफर दिली गेली. भाजपकडून शिवसेनेला राज्यात 5 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रिपदं देण्याची बोलवण झाली. एवढंच नाहीतर राज्यात हा तोडगा निघाल्यास रविवारी होणार्‍या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातही सेनेला आणखी दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यासाठी सेनेक डून अनिल देसाईंचं नाव शिवसेनेनं निश्चित केलंय. त्यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या कोट्यातून सुरेश प्रभूंना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं. त्यामुळे संध्याकाळी शिवसेनेचे केंद्रातले मंत्री अनंत गीते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी दिल्ली रवाना झाले. दिल्लीत सेव्हन रेसकोर्सवर पंतप्रधानांच्या निवास्थानी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत गीते यांची बैठक होणार होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी गीतेंना फोन करून तातडीने मुंबईला बोलावून घेतले. त्यामुळे पंतप्रधानांशी चर्चा न करताच गीते मुंबईला रवाना झाले. गीते माघारी परतल्यामुळे भाजप आणि शिवसेनेतला वाद आणखी चिघळला आहे.शिवसेनेनं अखेर विरोधीबाकावर बसण्याचा स्वाभिमानी निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. सेनेनं विरोधी पक्षात बसण्याची तयारी केली असून उद्या संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली. आता उद्या उद्धव ठाकरे सर्व आमदारांची बैठक घेणार आहे त्यानंतर आपली भूमिका मांडणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका घेता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2014 09:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close