S M L

उद्धवंचा आदेश धुडकावला, सुरेश प्रभूंनी घेतली शपथ

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2014 03:24 PM IST

उद्धवंचा आदेश धुडकावला, सुरेश प्रभूंनी घेतली शपथ

suresh_prabhu09 नोव्हेंबर : एकीकडे शिवसेनेनं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर बहिष्कार घातला पण सेनेच्या या आदेशालाच सेनेचे नेते सुरेश प्रभूनी वाटाण्याचा अक्षदा दाखवल्या. सुरेश प्रभू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी प्रभू यांच्या नावासाठी आग्रही होते, तर शिवसेनेनं मात्र अनिल देसाई यांचं नाव पुढे केलं होतं. प्रभू यांच्याकडे केंद्रात रेल्वेसारखं अतिशय महत्त्वाचं खातं सोपवलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.

अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना सुरेश प्रभू यांच्याकडे नदी जोड प्रकल्पाची धुरा सोपवण्यात आली होती. आताही त्यांच्याकडे मोदींच्या धोरणाला दिशा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल अशी अपेक्षा आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2014 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close