S M L

यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2014 03:47 PM IST

यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

cabinet309 नोव्हेंबर : लोकसभेत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर सत्तेवर विराजमान झालेल्या मोदी सरकारचा पहिलीवहिला केंद्रीय मंत्रिमंडळाता आज (रविवारी) विस्तार झाला. आज एकूण 20 मंत्र्यांनी शपथ घेतली.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, जे.पी. नड्डा, चौधरी बिरेंद्र सिंग यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर तेलंगणाचे दिग्गज भाजप नेते बंडारू दत्तात्रय, भाजपचे बडे नेते, निरीक्षक आणि पायलट राजीव प्रताप रुडी, नॉयडामधले भाजपचे खासदार आणि प्रसिद्ध डॉक्टर महेश शर्मा यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसंच महाराष्ट्रातून हंसराज अहिर यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मनोहर पर्रिकर

- गोव्याचे माजी मुख्यमंत्री

- गोव्याचे दोन वेळा मुख्यमंत्री

- संरक्षण मंत्रीपद मिळण्याची शक्यता

- गोवा भाजपचा चेहरा

- मिस्टर क्लिन इमेज

- संघाशी जवळीक

मुख्तार अब्बास नकवी

- भाजपचे राज्यसभा खासदार

- उत्तर प्रदेश रामपूरचे खासदार

- भाजपचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ता

- वाजपेयी सरकारमध्ये मंत्री

जे पी नड्डा

- पक्षप्रवक्ते आणि सरचिटणीस

- हिमाचलहून राज्यसभेचे खासदार

- हिमाचल सरकारमध्ये कायदामंत्री

- तीन वेळा आमदारकी

- 1993मध्ये पहिल्यांदा आमदार

हंसराज अहिर

- चंद्रपूरमधून खासदारकी

- तिसर्‍यांदा खासदार

- 1996मध्ये पहिल्यांदा खासदार

- कोळसा घोटाळ्याचा प्रश्न यूपीए सरकारमध्ये लावून धरला

- कोळसा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार मिळण्याची शक्यता

चौधरी बिरेंद्र सिंह

- हरयाणाचे दिग्गज जाट समुदायाचे नेता

- जवळपास 42 वर्षं काँंग्रेसशी निगडित राहिले

- हरयाणा निवडणुकीआधी भाजप प्रवेश

- सध्या राज्यसभा खासदार

जयंत सिन्हा

- झारखंड हजारीबागमधून खासदार

- ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र

- पहिल्याच निवडणुकीत खासदार

- 25 वर्षं अमेरिकेत वास्तव्य

सांवर लाल जाट

- अजमेरहून भाजप खासदार

- काँग्रेस नेते सचिन पायलट यांना एक लाख मतांनी हरवलं

- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या विश्वासू

- मेवाड भागातले जाट समुदायाचे प्रमुख नेते

राज्यवर्धन सिंह राठौड

-जयपूर ग्रामीणमधून भाजप खासदार

-पहिल्याच निवडणुकीत विजयी

-प्रसिद्ध नेमबाज

- लोकसभा निवडणुकीआधेी लष्करातून सेवानिवृत्ती घेऊन निवडणूक लढवली

-2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक

रामकृपाल यादव

-बिहार पाटलीपुत्रहून भाजप खासदार

ओबीसी नेते

-लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारतीचा केला पराभव

-निवडणुकीआधी आर जेडी सोडून भाजपत प्रवेश

तिसर्‍यांदा खासदार

-अनेक संसद समितींमध्ये सहभाग

गिरीराज सिंह

-बिहार नवादाहून भाजप खासदार

-पहिल्यांदाच खासदारकी

-बिहार सरकारमध्ये दोनदा मंत्री

-मोदींचे कट्टर समर्थक

-केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता

राजीव प्रताप रुडी

-बिहारमधील सारणमधून भाजप खासदार

-तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशचे प्रभारी

-लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी यांचा केला पराभव

-वाजपेयी सरकारमध्ये विमान उड्डाणमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली होती

मोहन कुंडारिया

-गुजरातमधील राजकोटचे भाजप खासदार

-पहिल्यांदाच खासदारकी

-पाच वेळा आमदारकी

-गुजरातमध्ये मोदी सरकारच्या काळातही मंत्रीपद

-पटेल समुदायाचे दिग्गज नेते

विजय सांपला

-पंजाबच्या होशियापूरचे भाजप खासदार

-पहिल्यांदाच खासदारकी

-पंजाब भाजपचा दलित चेहरा

-1990 मध्ये भाजपमध्ये प्रवेश

साध्वी निरंजन ज्योती

-उत्तर प्रदेशच्या फतेहपूरचे भाजप खासदार

-2012 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत हमीरपूरहून आमदार

- निषाद समाजाच्या नेत्या

बंडारु दत्तात्रेय

- सिकंदराबादहून भाजप खासदार

- तेलंगणा भाजपचे अध्यक्ष

- चौथ्यांदा खासदार

- आंध्र आणि तेलंगणाचे दिग्गज भाजप नेते

- वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय राज्यमंत्री

बाबुल सुप्रियो

आसनसोलहून भाजप खासदार

हिंदी आणि बंगाली चित्रपट गायक

पहिल्यांदा पश्चिम बंगालच्या आसनसोल जागेवर निवडणूक लढवली

भाजपला पश्चिम बंगालमध्ये एकमेव मिळालेली सीट

वाय एस चौधरी

- टीडीपचे राज्यसभा खासदार

- चंद्राबाबू नायडूंचे विश्वासू

-आंध्र प्रदेशमधले मोठे उद्योगपती

हरिभाऊ चौधरी

रामशंकर कथेरिया

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2014 03:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close