S M L

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार - शरद पवार

17 जून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याची तयारी दाखवली आहे. वेळ पडल्यास आमची स्वतंत्रपणे लढण्याचीही तयारी आहे, अशा स्पष्ट शब्दात शरद पवार यांनी काँग्रेसला इशारा दिला. बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक झाली. त्या बैठकीत पवार यांनी काँग्रेसवर टीका केली. राज्यात काही ठिकाणी सत्ता आपल्याच हातात ठेवण्याची वृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसला नडली, अशी स्पष्ट कबुली शरद पवार यांनी दिली आहे. ' मतदारांनी प्रादेशिक पक्षांना नाकारलं असा अर्थ चुकीचा आहे. कारण बिहारमध्ये नितीशकुमार आणि ओरिसात नवीन पटनाईक यांना मिळालेलं यश प्रादेशिक पक्षांचं यश आहे. यावेळी माझे तीन ते चार अंदाज चुकले, अतिआत्मविश्‍वास नडला, ' असंही पवारांनी मुंबईत सुरू असलेल्या चिंतन शिबिरात स्पष्ट केलं. कामाचा आणि शक्तीचा दर्प लोकांना आवडत नाही, त्यामुळेच लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान निवडणूक हरले, असंही पवार म्हणाले. काँग्रेसने शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या जाहिराती करून सत्ता मिळवली, त्याचा आम्हाला फायदा झाला नाही, अशी आगपाखडही त्यावेळी पवारांनी केली. सातबारा कोरा करण्याऐवजी, शेतकर्‍यांची थकबाकी माफ झाली, असा प्रचार करायला हवा होता, अशी सलही त्यांनी बोलून दाखवली. सहकार क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा सलोखा राहिलेला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. महिला बचत गटाला योग्य दिशा मिळाली नाहीतर बुमरँग होण्याची भीतीही पवारांनी बोलून दाखवली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2009 03:59 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2009 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close