S M L

दिल्लीत H1N1च्या आढळल्या चार केसेस : रुग्णांची संख्या झाली 35

17 जून नवी दिल्लीत H1N1 व्हायरसच्या आणखी चार केसेस आढळून आल्या आहेत. त्यामुळे देशभरातल्या रुग्णांचा आकडा आता 35 झाला आहे. दरम्यान, दिल्लीतल्या दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला एक 16 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता. त्याला आता परत आणण्यात आलं आहे. हा विद्यार्थी नासाहून परतलेल्या 20 जणांच्या टीमचा सदस्य आहे. त्याला H1N1 झाल्याचं अजून सिद्ध झालं नाही. गुजरातमध्येही पहिल्यांदाच H1N1 चा एक संशयित रुग्ण आढळला आहे. ही मुलगी 14 जून रोजी मिशिगनहून परतली होती. तिच्यात H1N1 लक्षणं आढळून आलीत. त्यामुळे तिला आणि तिच्या कुटुंबातल्या तीन सदस्यांना मेडिकल देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2009 04:20 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2009 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close