S M L

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दहा दिवसांच्या परदेश दौर्‍यावर

Samruddha Bhambure | Updated On: Nov 11, 2014 09:57 AM IST

Modi in Leh

11 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोेदी आजपासून दहा दिवसांच्या परदेश दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यात मोदी तब्बल 40 जागतिक नेत्यांची भेट घेणार आहेत. सर्वात आधी ते म्यानमारला जातील, तिथे ते आसियान आणि पूर्व आशिया परिषदांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान ऑस्ट्रेलियात होणार्‍या जी-20 परिषदेत सहभागी होणार आहेत.

अमेरिकेच्या मॅडिसन स्क्वेअर सारखाच हा कार्यक्रमही मोठा असणार आहे. तब्बल 15 हजार लोक मोदींना ऐकायला येणार असल्याची शक्यता असल्याने हा कार्यक्रम ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नच्या क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या दौर्‍यात मोदी ऑस्ट्रेलियाच्या संसदेतही भाषण देणार असून त्यानंतर ते फिजीला रवाना होणार आहे.

 या दौर्‍यादरम्यान मोदी कोणकोणत्या जागतिक नेत्यांना भेटणार?

- चीनचे अध्यक्ष ली केकियँग

- ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन

- जर्मनीच्या अध्यक्षा अँगेला मरकल

- फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँक्वा होलांद

- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी ऍबट

- म्यानमारच्या जागतिक कीर्तीच्या विरोधी पक्षनेत्या आँ सॅन सू की

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2014 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close