S M L

शालेय शिक्षण मंत्र्यांची 90 : 10 कोट्याला मंजुरी

18 जून विरोधाला न जुमानता अखेर शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी 90:10च्या कोट्याला मंजुरी दिली आहे. अकरावी प्रवेशाच्या 90:10चा कोटा पद्धतीचा जीआर काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेमुळे राज्यसरकारच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 90 टक्के कोटा देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव होता. तर उरलेल्या 10 टक्के जागा केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाण्याचा राज्य सरकारचा निर्णय होता. पण याबाबत अधिकृत घोषणा झाली नव्हती. राज्य सरकारच्या 90:10 कोटा प्रस्तावाच्या काही जण विरोधात होते तर काही जणांचा पाठिंबा होता. त्यामुळे कोटा प्रस्तावाला कायदेशीर मान्यता नाही, कोटा प्रस्ताव बारगळला अशा अनेक चर्चा गेला आठवडाभर सुरू होत्या. शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखेपाटीलच याबाबतचा निर्णय जाहीर करतील, असं सांगत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कोटा निर्णयाचा चेंडू शिक्षणमंत्र्यांच्या कोर्टात टाकला होता. मुख्यमंत्र्यांच्या तशा निर्णयामुळे अकरावी प्रवेशाचा 90:10 कोटा प्रश्नाचा निर्णय अंधातरी आहे असं वाटत होतं. तसंच शिक्षणमंत्री विखे पाटील यांनी बुधवारी दिवसभर याबाबत पालक संघटना, प्राचार्यांशी बैठका घेऊन चर्चा केली. त्यामुळे गुरुवारी तरी कोट्याबाबतचा संभ्रम शिक्षणमंत्री दूर करणार का, याकडे पालकांचं लक्ष लागलं होतं. अखेर राज्यसरकार आणि शिक्षण मंत्र्यांनी 90 : 10 कोट्याला मंजुरी देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 18, 2009 09:36 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2009 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close