S M L

मुलं 'आकर्षित' होतात म्हणून मुलींना लायब्ररीत प्रवेश बंदी !

Sachin Salve | Updated On: Nov 11, 2014 10:35 PM IST

मुलं 'आकर्षित' होतात म्हणून मुलींना लायब्ररीत प्रवेश बंदी !

11 नोव्हेंबर : मुली लायब्ररीत गेल्या तर त्यांचा पाठलाग करत मुलंही येतील म्हणून मुलींना लायब्ररीत येण्यास बंदी असावी असा अजब तर्क अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे कुलगुरू लेफ्टनंट जनरल जमीर उद्दीन शाह यांनी लढवल्यामुळे खळबळ उडाली आहे.

अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंनी नवा वाद निर्माण केलाय. लेफ्टनंट जनरल जमीर उद्दीन शाह यांनी युनिव्हर्सिटीच्या एका नियमाची पाठराखण केलीय. या नियमानुसार मुलींना युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत प्रवेश मिळत नाही. जर मुली लायब्ररीत गेल्या तर त्यांचा पाठलाग करत मुलंही येतील म्हणून मुलींना लायब्ररीत येण्यास बंदी असावी, असं ते म्हणाले. त्यंाच्या या विधानामुळे खळबळ उडालीये.पण,आता युनिव्हर्सिटीने म्हटलंय की, फक्त अंडरग्रॅजुएट मुलींना लायब्ररीत यायला बंदी आहे. पण वरच्या वर्गातल्या मुलींना लायब्ररीत येण्यात परवानगी आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याची दखल घेतलीय. आणि अलीगढ मुस्लीम युनिव्हसिर्टीकडून याबद्दलचा रिपोर्ट मागवलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2014 09:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close