S M L

अन्न सुरक्षा योजनेसाठी भारताचे एक पाऊल पुढे

Sachin Salve | Updated On: Nov 13, 2014 04:59 PM IST

FOOD BILL NEW43313 नोव्हेंबर : भारताच्या महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा योजनेसाठी केंद्र सरकारने आणखी एक महत्वाचे पाऊल पुढे टाकले आहे. अन्न सुरक्षा योजनेसंदर्भात भारत आणि अमेरिकेदरम्यान सहमती झालीये, त्यामुळे ही योजना राबवण्यापुढचा एक मोठा अडथळा दूर होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

अन्न सुरक्षा योजनेसाठी भारताला मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा करणं आवश्यक आहे, मात्र त्याला जागतिक व्यापार संघटना अर्थार डब्ल्युटीओची मान्यता नव्हती. त्यामुळे भारताने डब्ल्युटीओ करारावर सही केली नव्हती. इतकंच नाही, तर भारत या भूमिकेमुळे जगात एकटा पडल्याचंही चित्र होतं. भारतासारख्या मोठ्या देशानं अन्नधान्याचा साठा केल्यास जागतिक व्यापाराला फटका बसेल असा डब्ल्युटीओचा आक्षेप होता, तसंच भारतानं अन्नावर अनुदान देणंही डब्ल्युटीओला मान्य नव्हतं. मात्र, आता अमेरिकेला आपली भूमिका पटवून देण्यात भारताला यश आल्याचं वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलंय. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्‍यावर होते तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या झाल्या भेटीत अन्न सुरक्षेच्या बाबतील आम्ही आग्रही आहोत याबाबत डब्ल्युटीओने व्यक्त केलेल्या शंकांबाबत आम्ही चर्चेस तयार आहोत असं मोदींनी सांगितलं होतं.

डब्ल्युटीओची भूमिका काय होती ?

- भारतानं अन्नधान्यावर अनुदान देणं आणि अन्नधान्याचा साठा करणं डब्ल्युटीओच्या नियमांविरुद्ध

- भारतानं अन्नधान्यावर दिल्या जाणार्‍या अनुदानात कपात करावी

- भारताच्या भूमिकेमुळं जागतिक बाजारात अन्यधान्याच्या व्यापारावर विपरीत परिणाम होतो

यावर भारताची भूमिका काय होती ?

- भारत अन्नधान्यावरचं अनुदान बंद करणार नाही

- अन्नधान्याचा साठा करणं भारतासाठी गरजेचं आहे

- डब्ल्युटीओनंच आपले नियम बदलायला हवेत

- विकसित आणि विकसनशील देशांमध्ये फरक करायला हवा

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 13, 2014 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close